स्वयंभू मूर्ती

श्री रामचंद्रांनी स्थापन केलेल्या जागीच ही मूर्ती अद्याप आहे. मूर्तीस सकाळी पूजेसाठी हात लावल्यास हातास वाळू लागते. मूर्ती वालुकामय आहे. उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड असलेली भारतातील एकमेव मूर्ती आहे. मूर्तीची उंची ३५ इंच तर रुंदी २८ इंच आहे. मूर्ती चतुर्भुज असून हातात भाला, कट्यार, शस्त्र व चौथा हात आशीर्वाद देतांनाचा आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्य किरणाचा मुकुट आहे. शनि महाराज कोकीळ या पक्षावर मांडी घालून बसलेले आहे.

मूर्तीकडे आपण ज्या भावनेने पाहतो तसे आपणास दर्शन होते. सकाळी पूजेनंतर मूर्ती तेजोमय होते तर दुपारी मध्यम तर संध्याकाळी एखाद्याचा निरोप घेताना आपण जसे भावना विवश होतो. त्याप्रमाणे मूर्तीच्या भावना बदलतात.